
सबका साथ, सबका विकास, आता ‘सबका प्रयास’ करावा लागणार’ – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक घोषणा केल्याचं पाहायला मिळालं.
देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, आतापर्यंत ‘सबका साथ’,’सबका विकास’, ‘सबका विश्वास’ या धोरणेवर आपण चालत आलो आहोत. मात्र आता आजची बदलती परिस्थिती पाहता ‘सबका प्रयास’ हा आणखी एक घटक त्यामध्ये समाविष्ट करावा लागणार आहेे.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, बदलत्या काळानुसार, बदलत्या वेळेनुसार, देशातल्या नागरिकांनीही आपल्यामध्ये बदल करायला हवेत. बदल पाहता भारताच्या 100व्या स्वातंत्र्य दिनासाठी आपण आतापासूनच काही संकल्प केले पाहिजेत. जेव्हा आपण देशाचा 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करु तेव्हा आपला देश पायाभूत सुविधा आणि बाकीच्या सुविधांबाबत पुढारलेला असला पाहिजे.
दरम्यान, देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील 25 वर्षाच्या विकासाची दिशा मांडली. यावेळी कोरोना काळात केलेल्या कामगिरीविषयी सगळ्याचंच वंदन करण्यायोग्य असल्याचं, मोदींनी म्हटलं आहे.