‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

Featured मुंबई
Share This:

 

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO नेहमी कोरोना विषयी नवनवीन माहिती देते. तर कोरोना विरूद्ध लढ्यात जागतिक आरोग्य संघटनानं मोठी आणि मोलाची कामगिरी बजावली आहे. आरोग्य संघटनेनं लसीकरणावर भर देण्यास सर्वांना आग्रह धरला आहे. अमेरिकेसारख्या देशात लहान मुलांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच आता आरोग्य संघटनेनं श्रीमंत देशांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत पुन्हा एकदा विचार करावा, असं आवाहन WHO नं शुक्रवारी श्रीमंत देशांना केलं आहे. कोव्हॅक्स योजनेंतर्गत गरीब देशांना कोरोना लशी दान करायला पाहिजेत, असं आवाहन WHO चे प्रमुख अधानोम गेब्रियेसुस यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी भारताबाबत गंभीर इशारा देत चिंता व्यक्त केली आहे.

कोरोनानं आत्तापर्यंत जगभरात 33 लाखांहून जास्त जीव घेतले आहेत. आपण आता करोनाच्या दुसऱ्या वर्षात आहोत. पण हे दुसरं वर्ष पहिल्या वर्षापेक्षा अधिक भयानक असेल. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि लसीकरण या दोन्हींच्या एकत्रित मदतीनेच आपण यातून बाहेर पडू शकू, असं डॉ. टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी युद्धस्तरावर काम करत आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विरूद्ध लढ्यात देश नक्कीच विजय मिळवेल. यावेळी लसीकरण हा कोरोनापासून बचावासाठी महत्त्वाचा उपाय असल्याचं मोदी म्हणाले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *