
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी स्वप्निल सोनवणे
जळगाव- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जळगाव तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार स्वप्निल शांताराम सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली.जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी सर्वानुमते ही निवड केली.विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच मागील काही वर्षांमध्ये पत्रकारितेतील योगदानामुळे सोनवणे यांची या पदावर नियुक्ती झाली.
स्वप्निल सोनवणे हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकार संघात सक्रिय असून पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ते सदैव पत्रकार संघात वाटा उचलत आहेत.यावेळी सोनवणे यांनी पत्रकार संघाच्या वाढीसाठी तत्पर राहण्याची व पत्रकारांच्या समस्या मांडण्याची ग्वाही दिली.यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे,सल्लागार प्रा.नारायण पवार,महानगर कार्याध्यक्ष दिपक सपकाळे,महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख,वृत्तवाहिनी विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील,महानगर उपाध्यक्ष चेतन निंबोळकर,वृत्तवाहिनी जिल्हाध्यक्ष संतोष ढिवरे,उपाध्यक्ष संजय तांबे,भरत ससाणे,सुनिल भोळे,गुरुनाथ सैंदाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.सोनवणे हे जळगाव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे यांचे चिरंजीव आहेत.