पाकिस्तानातून पिझ्झा डिलिव्हरीच्या ड्रोनने IAF बेसवर हल्ला ?

Featured नंदुरबार
Share This:

 

श्रीनगर (तेज समाचार डेस्क): जम्मूमध्ये इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (iaf base attack) झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानच असण्याची दाट शक्यता आहे. कारण तपासात आतापर्यंत हाती आलेले धागेदोरे तसेच संकेत देत आहेत. पाकिस्तानने (pakistan) त्यांच्या देशात पिझ्झा (pizza delivery) आणि औषधांची डिलिव्हरी करण्यासाठी चीनकडून (china) मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स विकत घेतले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली आहे. (Jammu attack Were drones bought from China for pizza delivery used by Pakistan?)

रविवारी एअर फोर्स बेसवर हल्ल्यासाठी या ड्रोन्सचा वापर झाला का? त्या दिशेने आता तपास सुरु आहे. भारतात प्रथमच ड्रोनद्वारे एखाद्या सैन्यतळावर अशा प्रकारचा हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ल्याच्या प्राथमिक तपासात यामध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात दिसत आहे, असे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले.उच्च सुरक्षा असलेल्या एअर फोर्स स्टेशनच्या परिसरात पाच मिनिटांच्या अंतराने दोन बॉम्बस्फोट झाले. एटीसी टॉवर आणि तिथे पार्क केलेल्या हेलिकॉप्टरला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा हल्ला घडवण्यात आल्याची शक्यता आहे. पहिल्या स्फोटात एकमजली इमारतीच्या छताचे नुकसान झाले, तर दुसरा स्फोट मोकळया जागेत झाला.

 

“पाच ते सहा किलो वजनाच्या प्रत्येकी दोन IED मध्ये RDX मुख्य स्फोटक होते. ATC आणि हेलिकॉप्टरपासून जवळच हे दोन बॉम्ब टाकण्यात आले. चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केल्यामुळे हे बॉम्ब लक्ष्यापासून भरकटले किंवा हवेचा जोर जास्त असल्यामुळे हा हल्ला फसला” असे वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

जम्मूमधील या एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *