
नांदेड जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७ टक्क्यांवर स्थिर
मुंबई (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे (Corona Cured Patients) प्रमाण आजही ९७ टक्क्यांवर स्थिर आहे. मंगळवारी (ता.दहा) प्राप्त झालेल्या एक हजार ६२८ अहवालांपैकी चार अहवाल कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. मंगळवारी चार कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. आजच्या घडीला ४८ रुग्ण उपचार घेत असून एका बाधिताची प्रकृती अतिगंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात (Nanded) एकुण बाधितांची संख्या ९० हजार २३० एवढी झाली. यातील ८७ हजार ५२५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५७ एवढी आहे.
मंगळवारी जिल्ह्यातील चार कोरोना बाधितांना सुटी देण्यात आली. त्यात किनवट तालुक्यांतर्गत एक व महापालिका क्षेत्रातील दोन आणि हदगाव तालुक्यातील एक बाधितांना सुटी देण्यात आली. मंगळवारी ४८ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी दोन, किनवट कोविड रुग्णालय दोन, देगलूर कोविड रुग्णालय एक, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण ३९, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण चार व्यक्ती उपचार घेत आहेत.
नांदेड कोरोना मीटर
एकुण बाधित – ९० हजार २३०
एकूण बरे – ८७ हजार ५२५
एकुण मृत्यू – दोन हजार ६५७
मंगळवारी बाधित – चार
मंगळवारी बरे – चार
मंगळवारी मृत्यू- शुन्य
उपचार सुरु – ४८
अतिगंभीर प्रकृती – एक