देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

Featured मुंबई
Share This:

 

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात चालू असलेल्या सत्ता संघर्ष आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल शांततामय मार्गाने जिंकत अखेर संपुर्ण देशावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांची आणि अनेक विदेशी नागरिकांची देश सोडण्याची धडपड चालू झाली आहे.

तालिबानने काबूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर नागरिक पलायन करताना दिसत आहे. त्यामुळे आता कंधार विमानतळावर काल रात्रीपासून तुडूंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नागरिकांनी थेट विमानतळाच्या रन-वेवर मुक्काम ठोकला असल्यानं विमानाला खाली उतरता देखील येत नाही. तर जी विमानं विमानतळावर आहे, त्या विमानात देखील भरपूर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय.

काही अफगाणी नागरिक विमानात घुसण्याचा प्रयत्न कराताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी देश सोडण्यासाठी दुसऱ्या मार्गांचा उपयोग करावा, अशी विनंती आता अमेरिकेने अफगाणी नागरिकांना केली आहे. तर राजधानी काबूलमधील हमीत करझाई विमानतळावर देखील हजारो लोकांची गर्दी होताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच तालिबानने काबूल विमानतळावर कब्जा मिळवला. त्यानंतर अनेक उड्डाने रद्द करावी लागली आहेत.

दरम्यान, काल भारत सरकारने भारतीय नागरिकांना स्वदेशात परत आणलं. परंतु अजूनही काही नागरिक अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर एअर इंडिया पुन्हा नागरिकांना एअरलिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्तापित व्हावी, अशी इच्छा विदेश मंत्र्यालयाने व्यक्त केली आहे.

पाहा फोटो आणि व्हिडीओ-

 
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *