डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

Featured विदेश
Share This:

लंडन (तेज समाचार डेस्क):कोरोनानं जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनानंतर आता डेल्टा प्लस व्हेरिएंटनं डोकं वर काढत जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोना लसीकरण केल्यानंतरही डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं निदर्शनास येत असल्यानं या चिंतेत भर पडलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून कोरोना लसीकरणाविषयी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोना लसीकरणाविषयी आत्तापर्यंत अनेक संशोधन केलं गेलं असून आत्तापर्यंत भरपूर गोष्टी संशोधनातूून समोर आल्या आहेत. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासातून आणखी एक नवी गोष्ट समोर आली आहे. फायझर-बायोएनटेक आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशी अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी आहेत.

ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका ही लस डेल्टा व्हेरिएंटवर कमी प्रभावी असली तरी या दोन्ही लशी कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्सपासून चांगलं संरक्षण देत असल्याचंही या संशोधनात म्हटलं आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका ही भारतामध्ये कोविशिल्ड या नावानं ओळखली जाते.

दरम्यान, फक्त भारतातच नाही तर विदेशातही या डेल्टाच्या व्हेरिएंटनं चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. डेल्टा हा अधिक संसर्गजन्य असून तरुणांना याचा जास्त धोका असल्याचं म्हटलं आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *