
जळगाव : जिल्ह्यात आजपासून 18 वर्षावरील युवकांना लस
जळगाव (तेज समाचार डेस्क): शहरासह जिल्ह्यात आजपासून (ता.२२) १८ वर्षांवरील युवकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर १८ वर्षावरील युवकांना लस दिली जाणार आहे. ऑनलाईन नोंदणी विना लसीकरण केंद्रावर ही लस दिली जाईल. (coronavirus-vaccination-above-18-year-start-today)
जिल्हा कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाले आहेत. सोबत शासनाचे आदेश आहेत की २२ पासून १८ वर्षावरील नागरिकांना लस द्यावी. त्यानुसार लसी दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत सहा लाखापेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण झालेले आहे. गेल्या शनिवारपासून ३० वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झाले आहे.
वीस हजार लसी उपलब्ध
जिल्ह्यात आजपासून सर्व लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांना लस दिली जाईल. याकरीता २० हजार लस जिल्ह्यात आलेल्या आहेत. युवकांनी सामाजिक अंतर पाळून लस घावी. विशेष म्हणजे याकरीता ऑनलाइन नोंदणी न करताच लस घेता येणार आहे.
डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक