अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

Featured मुंबई
Share This:

अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबई (तेज समाचार डेस्क): टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. 44 वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *