
अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती
अंकिता सुशांतची विधवा म्हणून ढोंग करतेय- रिया चक्रवर्ती
मुंबई (तेज समाचार डेस्क): सुशांत आत्महत्या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं. तसेच रियानं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यावर देखील निशाणा साधला आहे. गेल्या चार वर्षात अंकिता कुठं होती, आता सुशांतच्या निधनानंतर ती हे सगळं का बोलतेय, असा सवाल रियाने अंकिता लोखंडेला केला आहे. तसेच अंकिता सुशांत गेल्यानंतर त्याची विधवा असल्याचं नाटक करतेय, असं रिया म्हणाली आहे.
सुशांतच्या मित्रासोबतच ती आता रिलेशनशीपध्ये आहे. तिचं हे वागणं समजण्यापलीकडचं आहे. सुशांतच्या घरात राहून घराचे कागदपत्र दाखवते. तिला नक्की काय साध्य करायचं आहे, असं रिया म्हणाली आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर एक्स गर्लफ्रेंड अंकितानं सुशांतच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या, तसंच सुशांतच्या कुटुंबियांच्या बाजूनं उभ राहणार असल्याचं सांगितलं. त्यामुळं रियानं अंकितावर टीका केली आहे.