यावल येथील राज्य मार्गालगत असलेल्या अतिक्रमित दुकानांचे काय ?

Featured जळगाव
Share This:

यावल येथील राज्य मार्गालगत असलेल्या अतिक्रमित दुकानांचे काय ?

दररोजची समस्या गेली खड्ड्यात

यावल पोलीस आणि नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष.

यावल ( सुरेश पाटील): काल दिनांक 5शुक्रवार रोजी यावल येथील आठवडे बाजारातील बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्य मार्गालगतची भाजीपाला विक्रेत्यांची व इतर काही दुकाने यावल पोलीस व यावल नगरपालिकेने संयुक्तिकरित्या हटविली अधून मधून करण्यात येत असलेली कार्यवाही कौतुकास्पद असली तरी यावल एसटी बस स्टँड पासून तर सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयापर्यंत आणि भुसावळ टी पॉइंट वर भुसावल रोडवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत अतिक्रमणाचे काय? आठवड्यातून एक वेळा वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी दुकाने हटविली जातात त्याच प्रमाणे दररोज वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमित दुकानांचे काय?याबाबत यावल शहरासह संपूर्ण तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जातात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या समस्येकडे यावल पोलिसांसह नगरपरिषदेचे अक्षम्य होत असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
यावल येथील आठवडे बाजार दर शुक्रवारी भरत असतो आठवडे बाजार बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या लागून नगरपालिकेच्या जागेवर भरत असल्याने अनेक भाजी विक्रेते आणि काही दुकानदार महामार्गाला लागून साईड पट्ट्यांवर आणि भर रस्त्यामध्ये आपली दुकाने लावीत असतात त्यामुळे महामार्गावरील मोठ्याप्रमाणात होणाऱ्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो काही अप्रिय घटना घडू नये म्हणून आठवडे बाजारा जवळील भाजीपाल्याची दुकाने बऱ्याच वेळेला यावल पोलिसांनी हटविली होती आणि आहेत आठवडे बाजाराचे काही दिवस संपल्यानंतर महिना-दोन महिन्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असते आणि यावल पोलिसांसह यावल नगरपालिका राज्य मार्गालगत ची दुकाने हटवित असतात.यासोबत यावल बस स्टँड पासून यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयापर्यंत आणि भुसावळ टी पॉइंट जवळ(यावल भुसावल रोडवर) राज्य मार्गालगत असलेली सर्व दुकाने आणि अनधिकृत अतिक्रमण काढणे संदर्भात यावल पोलीस आणि यावल नगरपरिषद सयुक्तिक रित्या ठोस कारवाई का करीत नाही?असा प्रश्न संपूर्ण यावल शहरात उपस्थित केला जात असून गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी तत्कालीन तहसीलदार आणि विद्यमान प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी यावल महसूल,यावल पोलीस व यावल नगरपरिषद यांची संयुक्तिक मोहीम राबवून यावल येथील राज्य महामार्गालगतचे अनधिकृत बेकायदेशीर अतिक्रमित दुकाने हटविले होते परंतु पुन्हा अतिक्रमणाची जैसे थे परिस्थिती झाली आहे याकडे संबंधित अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
तरी यावल येथील तहसीलदार महेश पवार यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकारी तडवी यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यावल येथील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गासह यावल भुसावळ रोडवरील टि-पॉईंट जवळील अनधिकृत अतिक्रमण काढावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *