‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्पादक देशांमधून खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तर देशभरात इंधन दरवाढीमुळे सर्वसामन्य हैराण झाले आहेत. कोरोना प्रादुर्भावातही खाद्यतेलाची मागणी कमी झालेली नाही. मागणी आणि पुरवठा यातील फरक वाढल्यानं या किमतीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

कोरोनामुळे बेकारीचे प्रमाण प्रामुख्याने शहरी भागात वाढलं आणि टिकूनही राहिलं. परंतु ही बेकारी ग्रामीण भागातही पसरू लागल्याचे चित्र समोर येत आहे, त्यामुळेच अतिशय चिंतेची बाब आहे, असं अर्थतज्ज्ञ महेश व्यास यांनी म्हटलं आहे. कोरोना काळातल्या उपाययोजनांमुळे एप्रिलपर्यंत बेरोजगारीचं प्रमाण पुन्हा आठ ते नऊ टक्क्यांच्या आसपास आलं आहे. परंतु मे मध्ये बेकारीने पुन्हा उसळी मारलेली दिसते. मे च्या अखेरीपर्यंत बेरोजगारीचा दर 14.7 टक्क्यांवर गेले, ही बाब असाधारण मानावी लागेल, असा इशारा अर्थतज्ञ महेश व्यास यांनी दिला आहे.

एकीकडे महागाई वाढत आहे तर, दुसरीकडे लोकांच्या हातात काम मिळत नाही, त्यामुळे आता लोकांच्या खिश्यावर मोठा ताण पडणार आहे. देशात कोरोना काळापासून आधी सरकारी नियमांमुळे उद्योगधंदे बंद पडत होते. दरडोई जीडीपी, गुंतवणूक, भांडवल निर्मिती, आयात व निर्यात या सर्व क्षेत्रात नकारात्मक वाढ नोंदली गेल्याचं सरकारी आकड्यानुसार नमूद झालं आहे.

दरम्यान, इंधनाच्या किंमती वाढल्यामुळं सामान्य लोकांच्या दरडोई आर्थिक बजेटवर परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खाद्यवस्तूंच्या किंमती कमी कराव्या, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *