सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार!

Featured देश
Share This:

 

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क) :  सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.

सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे.युवकांना जागोजागी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परीक्षा असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल, प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.

दरम्यान, या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *