यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किराणा दुकानात 6400 रुपयांची चोरी

Featured जळगाव
Share This:

यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किराणा दुकानात 6400 रुपयांची चोरी

पुरावा म्हणून चोरट्यांनी हिशोब लिहून दुकान मालक आणि पोलिसांना लावले कामाला.

यावल (सुरेश पाटील): यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या तसेच यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलनात असलेल्या श्री हरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स दुकानात आज मंगळवार दिनांक 31ऑगस्ट2021रोजी मध्य रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने दुकानाचे शटर व लोखंडी चॅनेलगेट तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील सामानाची शोधाशोध करून दुकानात गल्यात असलेले रोख6 हजार 400 रुपयेची रोकड़ मोजून एका कागदावर बेरीज लिहून ठेवून रक्कम घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले आहेत याबाबत यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसावळ टी पॉइंट जवळ अज्ञात चोरटे भुसावल कडून किंवा रावेर कडून किंवा चोपड्या कडून आले होते किंवा कसे किंवा अज्ञात चोरटे यावल शहरातीलच आहेत का याबाबतची चौकशी करणे यावल पोलिसांना एक मोठे आव्हान ठरले आहे, यावल पोलिसांची रात्रीची गस्त आहे किंवा नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून चोरीच्या घटनेबाबत दुकान मालक आणि पोलीस पुढील कार्यवाही काय करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *