“तेज समाचार” ऑनलाईन वृत्ताची तातडीने दखल-महसूलच्या वाळू पथकावर वाळूतस्करांची पाळत

Featured जळगाव
Share This:

“तेज समाचार” ऑनलाईन वृत्ताची तातडीने दखल-महसूलच्या वाळू पथकावर वाळूतस्करांची पाळत.

यावल तहसीलदार यांचे पथक मनवेल थोरगव्हाण परिसरात.

कारवाईकडे तालुक्याचे लक्ष वेधून

यावल ( सुरेश पाटील): काल दि.13 रोजी गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक असे वृत्त तेज समाचार कॉम मध्ये ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल यावल महसूल विभागाने घेतली असून आज दि.14 रोजी शासकीय सुटीच्या दिवशी महसूल पथक थोरगव्हाण मनवेल परिसरात गेले असता यावल महसूल पथक नेमके कोणत्या ठिकाणी चौकशी किंवा कारवाई करणार यासाठी खुद्द काही अवैध वाळू तस्करांनीच मोटर सायकलीवरून महसूल पथकाचा पाठलाग करून पथकावर पाळत ठेवल्याचे तसेच महसूल पथक अवैध वाळू वाहतूक दारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.पिळोदा, दगडी,मनवेल,थोरगव्हाण ही चार गावे मिळून एक तलाठी सजा कार्यालय असल्याने परिसरातील वाळू तस्करांना यावल महसूल पथक येत असल्याची माहिती मोबाईल वरून किंवा व्हाट्सअप वरून कोणी कशी व का दिली? यांचे नेहमीचे मासिक हप्ते सुरू आहेत का? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तरी महसूल पथकाने कारवाईसाठी जाताना आपल्या कारवाईची गोपनीयता बाळगणे आवश्यक झाले आहे महसूल पथकाची कारवाई वाळू तस्करांना समजून जात असल्याने वाळू तस्कर आपली वाळूची वाहने अज्ञात ठिकाणी लावून ठेवतात त्यामुळे अवैध वाळू वाहतूक दारांवर कारवाई होत नाही.अवैध वाळू तस्करांची अवैध वाळू वाहतूकची वेळ ही रात्री दोन वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत असते या वेळेतच महसूल पथकाने गस्ती पथक ठिकाणी तैनात करून कडक कारवाई करायला पाहिजे परंतु या वेळेस सुद्धा वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतात कशी हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *