तेज समाचार IMPACT: राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक पथक यावल शहरात कारवाई मात्र गुलदस्त्यात

Featured जळगाव
Share This:

तेजसमाचार इम्पॅक्ट

राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक पथक यावल शहरात कारवाई मात्र गुलदस्त्यात.

बिना परवानाधारक देशी,गावठी हातभट्टी दारूचे विक्रेते मात्र मोकाट.

यावल (सुरेश पाटील) : यावल शहरात190रुपयाची बिअर350 रुपयात विक्री करून मद्यपीची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट असे तेजस समाचार ऑनलाइन वृत्त दि.11मे2021 मंगळवार रोजी प्रसिद्ध होता बरोबर राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक भुसावळ विभागाचे पथक काल दि.11रोजी दुपारी यावल शहरात दाखल झाले होते त्यांनी कुठे कुठे चौकशी करुन कारवाई केली हे मात्र गुलदस्त्यात अडकून आहे.
पथक रवाना होता बरोबर संपूर्ण यावल शहरात गल्लीबोळात अनाधिकृत बिना परवानाधारक देशी व गावठी हातभट्टी दारू विक्रेते बनावट पन्नीतील आरोग्यास घातक अशी गावठी दारू विक्रेत्यांनी आपला व्यवसाय पुन्हा जोमाने खुलेआम सुरू केला,हे अवैध गावठी व देशी दारू विक्रेते म्हणतात की आम्ही संबंधित सर्व यंत्रणेला मासिक हप्ते देतो त्यामुळे आमच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही यात मात्र गरीब सर्वसामान्य मद्यपीच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे याकडे यावल पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाम मात्र आणि फक्त एक दोन वेळा कारवाई न करता सतत कारवाई करणेकामी सयुक्तिकरित्या मोहीम राबवून यावल शहरातील अनाधिकृत अवैध देशी व गावठी विक्रीचे व्यवसाय बंद करावेत तसेच यावल तालुक्यात संपूर्ण भुसावळ विभागात काही देशी दारू विक्री दुकानात मूळ मालकांन ऐवजी इतरत्र व्यक्ती मालक बनून देशी दारू व बियरची चढ्या भावाने विक्री करून मद्यपि ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहेत काही दुकानदारांना बिअरची फक्त पार्सल म्हणून विक्री करता येते ठराविक दुकानदारांना काही व्यापारी संकुलनातील लागू असलेल्या अटी शर्तीनुसार याकडे मात्र संबंधित संस्थाचालक यावल पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे काही देशी दारू विक्रेते खोकेच्या खोके संपूर्ण यावल तालुक्यात बिना परवाना धारक दारू विक्रेत्यांना विक्री करीत असतात यात संबंधित देशी दारू दुकानदार राज्य उत्पादन शुल्क विभाग दुय्यम निरीक्षक यांच्या संगनमताने सोयीनुसार रजिस्टरला नोंदी करून लाखो रुपयाची चांगलीच करून घेत आहेत याची चौकशी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी असे बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *