
आदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन
आदीवासी संघर्ष समीतीचे प्रांताधिकारी यांना निवेदन
यावल (सुरेश पाटील):फैजपुर भाग उपविभाग अधिकारी यांना महादेव, मल्हार टोकरे कोळी,समाजाच्या जातीच्या दाखल्यांचे विषयी येणाऱ्या अडचणी व प्रकरणे दाखल केल्या नंतर काय अडचणी येतात व सन 1950 पूर्वीचा जातीचा उल्लेख किंवा रहिवास असल्याचा पुराव्याचा आग्रह धरू नये या विषयावर प्रांत कैलास कडलग यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
या अगोदर या प्रान्त साहेबा कडून टोकरे कोळी जमातीचे 10 प्रमाणपत्रे मिळवले व त्या नंतर प्रलंबित प्रकारनणे मध्ये लवकरच निकाल देऊन टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र देईल असे प्रान्त यांनी सांगितले.या वेळी आदिवाशी संघर्ष समितीचे मुख्य संयोजक अङ् गणेश सोनवणे व यांनी प्रांताधिकारी यांचाशी चर्चा केली जिल्हा सदस्य संदीप प्रभाकर सोनवणे,मनोहर कोळी ता.अद्यक्ष रावेर,साबळे साहेव खेमचंद कोळी ता.युवाअध्यक्ष यावल, जालंदर कोळी यावल ता.अध्यक्ष,सौ सुनीताताई कोळी महिला जिल्हाअध्यक्षा,सविताताई कोळी रावेर ता.उपाध्यक्ष,सुभाष सपकाळे, विनोद कोळी,जंगलू बाविस्कर,भरत कोळी,राहुल कोळी,मोहन सपकाळे, अशोक सपकाळे,गजानन चाखले, योगेश सपकाळे,आदिवाशी संघर्ष समिती रावेर यावल सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व जमातबांधव उपस्थित होते तसेच अड गणेश सोनवणे यांनी येणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शनपर माहिती दिली.संदिपभैया सोनवणे व खेमचंद कोळी सरपंच पाडळसे यांनीही आपले मनोगत व विचार व्यक्त केले.