
शिरपूर भाजपातर्फे आ. अमरीशभाई पटेल यांचा सत्कार
शिरपूर भाजपातर्फे आ. अमरीशभाई पटेल यांचा सत्कार
शिरपूर (मनोज भावसार) : शिरपूर भाजपा तर्फे विधान परिषदेचे भाजपा उमेदवार आ. अमरीशभाई पटेल विजयी झाल्यामुळे शिरपूरात भाजपा तर्फे सत्कार करण्यात आला. धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषेदेवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. अमरीशभाई पटेल यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आक्टोंबर २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या रिक्त जागेवर दि.१ डिसेंबर रोजी झालेल्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पर्टी तर्फे उमेदवार होते त्यांनी ३३२ मते घेत निवडुन आलेत त्याबद्दल शिरपूर भाजपा तर्फे आ. अमरीशभाई पटेल यांचा सत्कार आ. काशिराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते करण्यात आला यावेळी पदाधिकार्यांनी फटाके फोडुन एकमेकांना पेढे भरवुन आनंद व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, मा. जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर बोरसे, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, अल्प संख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, राधेश्याम भोई, रविंद्र भोई, जितेंद्र पाटील, अविनाश शिंपी, रफिक तेली, लोटन पाटील, सतीश गुजर, राजुलाल मारवाडी, गोपाल मारवाडी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.