
आश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न
आश्रय फाउंडेशन तर्फे न्हावी येथे आरोग्य शिबीर संपन्न
यावल (सुरेश पाटील): ता.प्र. यावल तालुक्यातील न्हावी येथे यावल व रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशन आणि भुसावळ येथील भोळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आरोग्य शिबिर संपन्न झाले.
आश्रय फाऊंडेशन, यावल-रावेर व भोळे हॉस्पिटल भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय आरोग्य शिबीर न्हावी.ता यावल येथे पार पडले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ महाजन होते.व उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ.भारतीताई चौधरी यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी आश्रय फाऊंडेशन, यावल-रावेर अध्यक्ष डॉक्टर कुंदन फेगडे,उपाध्यक्ष डॉ विलास पाटील, सचिव डॉ पराग पाटील,डॉ प्रशांत जावळे,डॉ भरत महाजन खजिनदार डॉ राजेश चौधरी,रितेश बारी,आश्रय फॉउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी सागर लोहार,मनोज बारी उपस्थित होते
या शिबिरात नागरिकांना मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी करण्यात आली.