
पंकजा मुंडे यांनी केले शरद पवारांचे कौतुक, ट्वीट वर चर्चा सुरू
मुंबई (तेज समाचार डेस्क). हल्लीच भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा ला रामराम ठोकुन राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. त्याच सोबत पंकजा मुंडे विषयी पण चर्चा सुरू होती कि पंकजा पर भाजपा सोडुन राष्ट्रवादी मध्ये जाणार आहे, पण पंकजा यांनी या चर्चे वर विश्राम लावत नकार दिला होता, पण आता पंकजा यांनी आपल्या ट्वीट द्वारे शरद पवार यांच कौतुक केल्याने या चर्चेला पुन्हा एक नवीन धागा मिळाला आहे. कोरोनाच्या संकट काळातही शरद पवारांकडून सातत्यानं भेटीगाठी आणि दौरे सुरूच आहेत. त्यांच्या या दौरे करण्याच्या आणि बैठका घेण्याच्या उत्साहाला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सलाम केला आहे.
पंकजा यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत शरद पवारांच्या कामाविषयी आदर व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी मोठा जनाधार आहे. त्याचं मूळ त्यांचा दांडगा संपर्क आणि भेटीगाठीमध्ये आहे. करोनाच्या संकट काळातही शरद पवार यांचे दौरे आणि लोकांसोबतचा संपर्क थांबलेला नाही. शरद पवार यांच्या कामं करण्याचा उत्साह बघून पंकजा मुंडे यांनीही आदर व्यक्त करीत सलाम केला आहे.
दरम्यान, पवार यांच्या बद्दल पंकजा मुंडे यांच्या ट्वीटचा आत राजकीय अर्थ काढायला सुरवात झाली आहे.“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.
राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाच्या झपाट्याबद्दलचं हे ट्विट केलं.