नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक पदी तेजस पाटील यांची निवड

Featured जळगाव
Share This:

नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक पदी तेजस पाटील यांची निवड

यावल (सुरेश पाटील): तालुक्यातील शिरसाड येथील तेजस धनंजय पाटील यांची नेहरू युवा केंद्र जळगाव येथे यावल तालुका समन्वयक म्हणून निवड झाली.भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येत असलेले एक स्वायत्त संस्था म्हणजे नेहरू युवा केंद्र आहे. तळागाळापर्यंत रुजलेले जगातील हे सर्वात मोठे युवकांचे जाळे आहे.राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावना युवकांमध्ये जागृत करण्याचे कार्य संघटने मार्फत होत असते.ग्रामीण भागातील उपक्रमांना जास्त भर दिला जातो. देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नेहरू युवा केंद्रामार्फत विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.अशा या भारत सरकार संलग्न नेहरू युवा केंद्रामध्ये यावल तालुका समन्वयक म्हणून तेजस पाटील यांची निवड झाली. ही निवड नेहरू युवा केंद्राचे जिल्हा ऑफिसर नरेंद्र डागर सर व टीम यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली.तेजस पाटील यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानामुळे ही निवड झालेली आहे.तेजस धनंजय पाटील हे शिरसाड ग्रामपंचायत सदस्य तथा यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघाचे युवा संचालक आहेत.त्यांच्या निवडीचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे. तसेच यावल तालुक्यातील ग्रामीण भागात भारत सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा तेजस पाटील यांचा मानस आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *