जळगाव जिल्हा उपनिबंधक म्हणून संतोष बिडवई यांनी पदभार स्विकारला

Featured जळगाव
Share This:

जळगाव जिल्हा उपनिबंधक म्हणून संतोष बिडवई यांनी पदभार स्विकारला

यावल (सुरेश पाटील): जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगांव म्हणून संतोष बिडवई यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2020 मंगळवार रोजी पदभार स्वीकारला आहे.

जळगांव जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड हे दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी सेवानिवृत्त झाल्याने जळगांव जिल्हा उपनिबंधक पद रिक्त झाले.दिनांक 31 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेघराज राठोड यांना प्रेमपूर्वक निरोप दिला. दुसऱ्या दिवशी तात्काळ जिल्हा उपनिबंधक म्हणून संतोष बिडवई यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशान्वये पदभार स्विकारला यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगांव कार्यालयातील तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जळगांव जिल्हा बँक कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ, जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक यांनी व सहकार क्षेत्रातील अनेकांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *