महाविकास आघाडी राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट ?

Featured जळगाव
Share This:

महाविकास आघाडी राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट ?

पैसे देताना आणि घेतानाची क्लिप सांभाळून,राजकारणात त्या पक्षात व्हाट्सअप वरून चर्चेला उधाण.

यावल (सुरेश पाटील): महाविकास आघाडीचे राज्यात यावल तालुक्यात माहिती अधिकार,खंडणी,आंदोलन, उपोषण,अक्ट्रॉसिटी राजकीय प्रभावाने अधिकारी आणि ठेकेदारांची आर्थिक लूट केली गेली असल्याची जोरदार चर्चा यावल तालुक्यात त्या राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मध्ये सुरू आहे. यावल पंचायत समिती कार्यालयाजवळ पैसे देण्याघेण्याच्या वेळेला एका कार्यकर्त्यांनी व्हिडिओ शूटिंग आणि छायाचित्रण केल्याने आणि व्हाट्सअपवर मोठी चर्चा झाल्याने याबाबत मोठी खळबळ उडाली आहे,त्या कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष आणि कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ आणि आशिर्वाद आहेत याबाबत सुद्धा जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष केंद्रित करून यावल तालुक्यातील त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबाबत वेळीच आत्मचिंतन करून कारवाई न केल्यास यापुढे नियोजनकरून त्या कार्यकर्त्याला पैसे घेताना रंगेहात पकडण्यात येणार असल्याचे सुद्धा त्याच पक्षात बोलले जात आहेत.
तालुक्यात अनेक शासकीय,निमशासकीय कार्यालयात तसेच अधिकारी ठेकेदार यांच्या कामासंदर्भात माहिती अधिकाराचा अर्ज टाकून माहिती न घेण्यासाठी तसेच माहिती घेतल्यानंतर पुढील कारवाई होऊ नये म्हणून त्या अधिकारी किंवा कर्मचारी तसेच ठेकेदारावर आपल्या राजकीय पक्षाचे आणि पाठबळ असलेल्या पदाधिकार्‍यांचे मध्यस्थी साठी नाव सांगून म्हणजे राजकीय प्रभाव टाकून आंदोलन,उपोषण, वेळ पडल्यास काही ठिकाणी अक्ट्रासिटीचा दम भरून पाहिजे तेवढी खंडणी वसूल करून प्रकरण ‘रफा,दफा’ केले जात आहे तालुक्यात अशा या काही कार्यकर्त्यांनी कोण कोणत्या कार्यालयात आणि कोणकोणत्या ठेकेदाराबबत अधिकाऱ्याकडे तक्रार अर्ज आणि माहितीचे अर्ज टाकलेले आहेत याची चौकशी आणि माहिती घेतल्यानंतर काय कारवाई केली,घेतलेल्या माहितीची प्रसिद्धी किंवा संबंधितांकडे तक्रार केली आहे किंवा नाही? याची चौकशी जिल्हाधिकारी जळगाव आर्थिक गुन्हे शाखा व एलसीबी पथकाकडून केली जाणार असल्याचे यावल तालुक्यात बोलले जात आहे तरी यावल तालुक्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी आज पाहतो असे खंडणी उकळण्याचे कृत्य केलेले नसल्यामुळे आपल्या प्रसिद्ध राजकीय पक्षाच्या ध्येय,धोरण, उद्दिष्टानुसार आपल्या तालुकाध्यक्षाला सदर घटनेची जाणीव करून देऊन अशा त्या कार्यकर्त्यांना पाठबळ न देता(त्या कार्यकर्त्यांने आजपर्यंत कोणतेही संघटन न केल्यामुळे)तात्काळ कारवाई करून पक्षातून हकालपट्टी करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.पक्षाची मीटिंग घेऊन15 दिवसाच्या आत त्या कार्यकर्त्या विरुद्ध कारवाई न झाल्यास पैसे देताना घेताना व्हिडीओ चित्रण केलेली क्लिप व्हाट्सअप वर व्हायरल केली जाणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *