
पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद
पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे वीरपुत्र ऋषीकेश शहीद
मुंबई (तेज समाचार डेस्क): पाकिस्तानने आज शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने एक वीरपुत्र गमावला आहे.
कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.
जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.