यावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे

Featured जळगाव
Share This:

यावल-रावेर तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या1500 सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन निशुल्क नोंदणी करावी; डॉ.कुंदन फेगडे.

यावल (सुरेश पाटील) :यावल-रावेर तालुक्यातील व परिसरातील सर्व रिक्षा चालक बांधवांसाठी महत्त्वाची सूचना कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लॉक डाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थीक अडचणीत आलेल्या राज्यातील रिक्षा चालकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील7लाख5हजार रिक्शा चालकांसाठी1500रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असुन,यासाठी निशुल्क रिक्शा चालकांच्या नांव नोंदणीसाठी यावल नगरपरिषदचे युवा स्विकृत नगरसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी यावल येथे नांव नोंदणीसाठी ऑनलाइन निशुल्क कक्ष उभारणी केली आहे.कोविड-19च्या लॉकडाऊन मूळे आर्थिक संकटात सापडलेल्या परवाना धारक सर्वसामान्य रिक्षा चालकांना1500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान रुपाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून देण्यासाठी यावल रावेर तालुक्यातील जनसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे निशुल्क सेवा कक्ष दि.26मे2021पासून सुरू करण्यात आले आहे तरी यावल व रावेर या तालुक्यातील रिक्शा चालकांनी योजनेचा लाभ घ्यावा….

यावल येथील भुसावळ रोड वरील टी पौईंट जवळ असलेल्या आई हॉस्पिटल चे शेजारी श्री कलेक्शनच्या खाली उभारण्यात आलेल्या निशुल्क नांव नोंदणी कक्षात तात्काळ आपल्या नांवाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी,तसेच सविस्तर माहीतीसाठी डॉ.कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार यांच्या मो.नं.7220721799 तसेच उज्वल कानडे मोबा.नं.9158325143,रितेष बारी मोबा.क्र.7499419496 यांच्याशी संपर्क साधुन या अनुदानाविषयी अधिक माहीती जाणुन घ्यावी व आपल्या नांवाची तात्काळ नोंदणी करून घ्यावी व महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल-रावेर तालुक्यातील रिक्शाचालकांसाठी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *