आर सी पटेल अभियांत्रिकीच्या प्रा भूषण वामनराव पाटील यांचे संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून  मान्यता

धुळे
Share This:

आर सी पटेल अभियांत्रिकीच्या प्रा भूषण वामनराव पाटील यांचे संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून  मान्यता

 

जळगाव (तेज समाचार डेस्क) : आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉम्म्युनिकेशन विभागातील प्रा. भूषण वामनराव पाटील ह्यांच्या “अँन आर्टीफिसिअल  इंटेलिजन्स  बेस्ड  सिस्टिम  टू एडेंटिफाय  द  मेडिकल  कंडिशन  प्रयार टू डॉक्टर कॉन्सुलेटेशन” ह्या  अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून मान्यता मिळाली असुन,

हे संशोधन  कोणत्याही रुग्णाची वैद्यकीय तपासणी ही डॉक्टर सल्लामसलत करण्यापूर्वी सध्याच्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स आधारित प्रणालीशी संबंधित आहे, तरी ह्या  स्वयंचलित  प्रणाली द्वारे आर्टिफिसिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने  रुग्णाची वैद्यकीय चाचणीच्या रिपोर्ट आधारे संबंधित आजाराचा परिणाम समजू शकतो  ,ह्या विकसित प्रणाली मध्ये आपण एखाद्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत इंटरनेट किंवा वाय-फाय कनेक्शनच्या मदतीने सॉफ्टवेअर अनुप्रयोगासह स्थापित केले आहे. ह्या मध्ये रुग्णाच्या पूर्वीच्या आरोग्य नोंदी ह्या थेट वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक डेटाबेसशी जोडलेले आहेत. त्या नुसार एखादी व्यक्ती नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करू शकते,आणि आरोग्याच्या नोंदी  स्वयंचलितपणे डेटाबेसमध्ये आणि कृत्रिमरित्या जतन केल्या जाऊ शकतात.

ह्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या उपयोग निदान चाचण्यांच्या परिणामाचे स्वयंचलितपणे अर्थ लावण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्या संशोधनाचा आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा बदल घडून आणू शकतो, जे कोणत्याही रुग्णाच्या आरोग्याच्या नोंदींमध्ये असामान्य असलेल्या मापदंडांना  समजू शकतो, रुग्णाच्या उच्च किंवा असामान्यपणे कमी जास्त होणाऱ्या  पॅरामीटर्स  चा परिणाम रुग्णाला ऑडिओ टीपद्वारे त्याचा  परिणाम  समजू शकतो.

प्रा . भूषण पाटील ह्यांना ह्या पेटंट साठी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक लॅब चा ही उपयॊग झाला असून, येणाऱ्या काळात ह्या पेटंट च्या साहाय्याने रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्या नुसार होणाऱ्या आजाराची सुरुवातीलाच कल्पना येऊ शकते, व वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा बदल घडून येऊ शकतो,

प्रा. भूषण पाटील ह्यांना त्यांच्या ह्या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून  मान्यता मिळाली, त्यासाठी विभाग प्रमुख प्रा. डॉ . प्रमोद देवरे ह्यांचेही मार्गदर्शन लाभले, त्यांनी या आधीही आपल्या संशोधनातून वेगवेगळ्या अशा राष्ट्रीय व अंतरराट्रीय परिषदातून संशोधन पेपर प्रसिद्ध केले आहेत, त्यांच्या ह्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपकार्याध्यक्ष मा राजगोपालजी भंडारी  व  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ . जे बी पाटील , जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, व सर्व विभाग प्रमुख ह्यांनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *