यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त.

28 वर्ष यशस्वी सेवाकाळ.

यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेत गेल्या 28 वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे हे आज दि.31मे2021सोमवार रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी व यावल नगरपालिका कर्मचार्‍यांनी स्नेह,प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आज दि.31मे2021सोमवार सेवापूर्ती दिनानिमित्त त्यांनी सेवानिवृत्त होत असताना नगर परिषदेतर्फे आयोजित छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की 1एप्रिल1993 या दिवशी मी यावल नगरपालिका सेवाकार्यात पाऊल ठेवले एकंदरीत माझ्या संपूर्ण सेवाकार्यकाळात मला माझ्या सर्व अधिकारी,कर्मचारी,पदाधिकारी व नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांचे कडून मिळालेल्या सहकार्यामुळे नगरपालिकेत चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन व अनमोल अशी केलेली मदत या बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी जे सुयश शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.रमाकांत मोरे यांना सेवानिवृत्ती निमित्त यावल शहरातून सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *