3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार आणि काय बंद राहणार?

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क):  केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारनेही देखील आपली नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारने देखील 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 3 टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि मंदिरेही बंदच ठेवण्यात येणार आहेत.

3 जूनपासून या गोष्टी सुरू होणार… (प्रथम टप्पा)

  • प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी असणार आहे.
  • गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र त्यासाठी आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना
  •  सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती 5 टक्के होती

5 जूनपासून खालील गोष्टी सुरू होणार…  (दुसरा टप्पा)

  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
  • कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
  • दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे
  • खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
  • अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
  •  खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते

8 जूनपासून कोणत्या गोष्टी सुरू होणार… (तिसरा टप्पा) 

  • सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी उपस्थिती चालवण्यास परवानगी, उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय
  • कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना
  • अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी 1 चालक 1 प्रवासी, रिक्षा 1 चालक 2 प्रवासी, खाजगी चारचाकी 1 चालक 2 प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी

कंटेंनमेंट झोनमध्ये कोणताही शिथिलता नाही

  • मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट
  • यात संचारबंदी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूट
  • ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी
  • शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई

उर्वरित राज्यात

  • परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही
  • खुली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत
  •  स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही
  • जिल्हा अंतर्गत बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यास परवानगी
  • सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी
  • गर्दी आढळल्यास मात्र बंद करण्याचा इशारा
  •  राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार
  • राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार
  • खालील बाबींवर संपूर्ण राज्यात बंदी कायम
  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार
  • मेट्रो बंद राहणार
  • स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *