नंदूरबार :  रघुवंशी परिवारा तर्फे निर्मित होणाऱ्या छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार ( वैभव करवंदकर). आरोग्याची सेवा नंदनगरी व जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध करण्यासाठी रघुवंशी परिवारातर्फे येत्या दीड वर्षात 125 बेडचे सर्व सुविधा सह अद्ययावत असलेले छत्रपती मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन सोहळा आज माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

रघुवंशी परिवारातर्फे शनिवारी सकाळी येथील विलासराव देशमुख ट्रक टर्मिनस च्या समोर असलेल्या जागेत छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या इमारत बांधकामाचा प्रारंभ आज करण्यात आला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी रघुवंशी यांनी हॉस्पिटलच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. त्यात 125 बेडचे अद्ययावत सुविधा असलेले हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे ते दीड वर्षात पूर्ण करण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील नागरिकांना छोट्या-मोठ्या आजारासाठी बाहेरगावी उपचारासाठी जावे लागते ही सोय जर आपल्या शहरात झाली तर जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य ठरेल. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील. शासनाकडून ज्या आजारांवर मोफत उपचार केला जातो त्यासाठीचा सुविधा देखील येथे उपलब्ध करण्यात येतील असेही श्री रघुवंशी यांनी सांगितले.

रघुवंशी यांच्या समवेत नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी ,कविता रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी ,डॉ तुषार रघुवंशी ,किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी ,डॉ कल्याणी रघुवंशी, शिल्पा रघुवंशी, राधिका रघुवंशी ,कल्याणी यशवर्धन रघुवंशी, यांच्यासह पालिकेचे व विविध संस्था संघटनांचे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होतेआदी उपस्थित होते.

 

फोटो ओळी……

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *