पुणे :चादरीत गुंडाळलेला मृतदेह ठेवून दोघे पसार

Featured पुणे
Share This:

पुणे (तेज समाचार डेस्क): हडपसर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह आणून मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर टाकण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. लोहिया उद्यानासमोर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक टेम्पो आला. या टेम्पोतून चादरीत गुंडाळलेला मृतदेह दोघांनी बाहेर काढला. त्यानंतर उद्यानासमोर तो फेकून दोघे जण पसार झाले.नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांना धक्काच बसला. चादरीत काय गुंडाळून फेकून दिलं आहे, या भीतीने काही नागरिक तेथून पळून गेले.

दरम्यान, या भयानक प्रकाराने परिसरात खळबळ माजली. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना कळवलं.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *