यावल येथील जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीची प्रॉपर्टी नगर परिषदेने केली जप्त

Featured जळगाव
Share This:

यावल येथील जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीची प्रॉपर्टी नगर परिषदेने केली जप्त.

1 कोटी 84 लाखांची थकबाकी.

यावल (सुरेश पाटील): येथील बंद असलेल्या जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणीकडे यावल नगर परिषदेचा प्रॉपर्टी टॅक्स सन 2012/2013 पासून तर सन् 2020/2021प्रयन्त एकूण1कोटी 84 लाख12हजार964 रुपये थकबाकी झाल्याने आज दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा आदेशान्वये यावल नपा कर्मचाऱ्यांनी यावल सूतगिरणीची प्रॉपर्टी जप्त केली.
यावल येथील जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी बंद असून सूतगिरणी कडे यावल नगर परिषदेचा प्रोपर्टी टॅक्स सन 2012 पासून तर सन 2021या आर्थिक वर्षात थकित झाला होता आणि आहे प्रॉपर्टी टॅक्स 1कोटी 84लाख12 हजार 964 रुपये सुतगिरणी कडून भरणा न झाल्याने यावल नगरपरिषदेने कटू निर्णय घेऊन सुटगिरणी ची प्रॉपर्टी जप्त केली.
जे.टी.महाजन सहकारी सूतगिरणी प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई यावल नगरपरिषदेचे सहाय्यक कर निरीक्षक निकेतन बयाणी,यावल नगरपालिका वरिष्ठ लिपीक तथा वारंट बजावणारे अधिकारी राजेंद्र गायकवाड, वसुली लिपिक अनिल चौधरी,रवींद्र बारी,मधुकर गजरे, संतोष नन्नवरे,असदउल्लाखान अब्दुल्लाखान, रफीक अहमद सईद अहमद. यांनी केली यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *