डोंगरकठोरा येथे झन्नामन्ना जुगारीच्या अडुयावर पोलीसांची धाड

Featured जळगाव
Share This:

डोंगरकठोरा येथे झन्नामन्ना जुगारीच्या अडुयावर पोलीसांची धाड.

10जणांसह3मोटरसायकल असे1लाख3हजाराचे साहीत्य जप्त.

यावल ( सुरेश पाटील ): तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका मंदीरा जवळ सार्वजनिक ठीकाणी झन्नामन्ना हा पत्त्याचा जुगार खेळतांना पोलीसांनी धाड टाकुन11 जणांसह 52पत्त्याचे साहीत्य हिरो कंपनीच्या3मोटरसायकलीसह50 हजार रुपये रोख असे1लाख3 हजाराहुन रक्कम जप्त केली आहे.या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.30जुन रोजी17 वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा गावातील डोंगरकठोरा ते यावल रस्त्यावरील खंडेराव मंदीरा जवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठीकाणी जगदीश रतन धनगर,राहणार सांगवी बु॥तालुका यावल,मिलींद संतोष कोळी,राहणार डोंगर कठोरा ता. यावल,तुषार वसंत फेगडे,रा. अट्रावल ता.यावल,प्रदीप रवीन्द्र भालेराव,राहणार कोळवद ता. यावल,गोवींदा सुरेश कोळी,रा. अट्रावल ता.यावल,नितिन पंढरीनाथ चौधरी,राहणार अट्रावल ता.यावल,अन्वर फकीरा तडवी,राहणार डोंगर कठोरा ता. यावल,सुशाल अशोक कोळी, रा.डोंगर कठोरा ता.यावल,दिलीप कृष्णा तेली राहणार सांगवी बु॥ तालुका यावल,चंदन भिमराव अढाईगे राहणार कोळवद ता . यावल,अशा10जणांना झन्नामन्नाचा जुगार खेळतांना पत्ता जुगारीचे साहित्य साधनासह 3 मोटरसायकली सह एकूण1लाख3 हजार550रुपयांचे म्हणुन जुगारीच्या ठीकाणाहुन जप्त करण्यात आले असुन, यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अमलदार सुशिल रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये मुबंई जुगार अॅक्ट प्रमाणे12प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान व त्याचे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत करीत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशाने चार दिवसापुर्वीच यावल शहरातील एका जुगारीच्या अड्ड्यावर धाड टाकण्यात आली होती त्यानंतर यावल पोलीसांनी जुगारीच्या वरील दुसरी कार्यवाही असुन या कार्यवाहीचे विशेष करून महीला वर्गाकडुन स्वागत करण्यात येत असुन,याचप्रमाणे तालुक्यातील आणखी कुठे अशा प्रकारे जुगारीचे अड्डे चालत असतील तर ते देखील बंद करावे अशी अपेक्षा नागरीकांकडुन व्यक्त होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *