सावखेडासिम येथील पोलीस पाटलाचे भाऊ पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Featured जळगाव
Share This:

सावखेडासिम येथील पोलीस पाटलाचे भाऊ पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडण्याचे कारण.

यावल (सुरेश पाटील): रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदार यांनी पकडल्याने विचारण्याचे कारणावरून सावखेडासिम येथील पोलीस पंकज बडगुजर व त्यांचे भाऊ आणि पत्नी व इतर दोन अशा एकूण पाच जणांनी एका महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच उद्धट अशील भाषा वापरल्याने महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे तालुक्यात पोलीस पाटील वर्गात मोठी खळबळ उडाली आहे सदरच्या घटनेबाबत यावल पोलिसांनी कायद्याच्या नावाखाली आणि नेहमी संपर्कात असलेले पोलीस पाटील यांची आधी फिर्याद घेऊन नंतर महिलेची फिर्याद घेऊन पोलीस पाटील व पोलीस यांचे नाते घट्ट असल्याचे निदर्शनात आणून दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सावखेडासिम येथील 65 वर्षीय महिलेने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दि.2 जुलै 2021शुक्रवार रोजी दुपारी2 वाजेच्या सुमारास सावखेडासिम गावात वडाचे झाडाखाली भूषण सोमनाथ पाटील यांचे घरासमोर सार्वजनिक जागेवर,रोडवर सावखेडासिम येथील पोलीस पाटील तथा संशयित आरोपी पंकज जिवराम बडगुजर,राहुल जिवराम बडगुजर,जिवराम दयाराम बडगुजर,दिपाली राहुल बडगुजर व शकुंतला जिवराम बडगुजर सर्व रा.सावखेडासिम तालुका यावल यांनी फिर्यादी ही त्यांचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदार यांनी पकडल्याने विचारण्याचे कारणावरून संशयित पाचही आरोपींनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून राहुल बडगुजर यांने फिर्यादीस उद्धट व अशील भाषा वापरून ‘असे’ केल्यास पाच मिनिटात तुझे ट्रॅक्टर देईन असे बोलून फिर्यादीस छातीवर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीचा मुलगा प्रकाश सुभाष पाटील,दिलीप सुभाष पाटील, तसेच पुतण्या विजय विकास पाटील,चेतन विकास पाटील, यांना सुद्धा मारहाण केली व शिवीगाळ केली म्हणून यावल पोलीस स्टेशनला भाग5गुन्हा र.नं.117/2021भा.द.वि.कलम 143,147,149,509,323, 504,34,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेती वाहतूक प्रकरणात सावखेडा सिम येथील पोलीस पाटलाने उडी मारल्यामुळे तसेच राजकीय मतभेदांमुळे सदरची घटना घडल्याचे संपूर्ण सावखेडा सिम गावासह तालुक्यात बोलले जात आहे या घटनेत पोलीस पाटील यांचे नाव समोर येता बरोबर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आप आपसात तडजोडी मध्ये बराच वेळ गेल्यानंतर फिर्यादी व आरोपी यांच्या परस्पर विरोधात तक्रारी आल्याने यावल पोलीस स्टेशन मध्ये दोघं गटाने विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे यामुळे यावल तालुक्यात संपूर्ण पोलीस पाटील वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच सावखेडासिम येथील पोलीस पाटील यांच्या घरात घुसुन वाळु वाहतुक करणाऱ्यांच्या एका गटाने पोलीस पाटील यांच्या घरात घुसुन त्यांच्या कुटुंबातील मंडळीला लाकडी दांडाने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन, पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दि.2जुलै रोजी रात्री 8वाजेच्या सुमारास सावखेडासिम तालुका यावल येथील पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील प्रकाश सुभाष पाटील,दिलीप सुभाष पाटील,विकास पंडीत पाटील, विजय विकास पाटील,चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करून तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडायला लावतो असे बोलुन तु पोलीसपाटील कसा राहतो असे बोलुन व शिवीगाळ करीत संशयीत आरोपी यांनी पोलीस पाटील यांना खाटेच्या दांडाने मारहाण केली या वेळेस माझ्या भाऊची पत्नी पुनम जिवन बडगुजर व भाऊ जिवन दयाराम बडगुजर,राहुल जिवन बडगुजर यांना ही लाकडी दांडयाने मारहाण करून दुखापत केली . याबाबत पोलीस पाटील पंकज जिवन बडगुजर वय35वर्ष राहणार सावखेडा सिम यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्यावरून भाग5 गु.र.न.116/2021भादवी कलम143,147,149,452,323,324,504,506,34प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *