‘या’ अभिनेत्रीमुळे पोलिसांना सापडला राज कुंद्रा!

Featured मुंबई
Share This:

 

मुंबई  (तेज समाचार डेस्क): प्रसिद्ध उद्योजक आणि बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मीती करुन या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठलाही अटक करण्यात आलं होतं.

फेब्रुवारीमध्ये अश्लील व्हिडीओ शूट करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी अकरा जणांना अटक केली होती. अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठचं नाव समोर आलं होतं.

तपासामध्ये समोर आलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत यांना केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळायचं. राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी केनरिन प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन आहे. या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे.

दरम्यान, अभिनेत्री गहना वशिष्ठ आणि उमेश कामत यांच्या चौकशीतून धागेदोरे लागत राज कुंद्राची चौकशी करण्यात आली. जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *