
महावितरण कंपनीची पठाणी वसुली
महावितरण कंपनीची पठाणी वसुली
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शनिवार रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महावितरण कंपनीने बंद दुकानाच्या वीज पुरवठा कापण्याचे तडाका लावला आहे. या माध्यमातून महावितरण कंपनीने पठाणी वसुली सुरु केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या पादुर्भाव वाढत असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसाच्या कडकडीत लॉकडाऊनचे आदेश असल्यामुळे संपूर्ण बाजारपेठ दुकान बंद आहेत. महावितरण कंपनीची अधिकारी यांनी शनिवारी मिटींग घेऊन आदेश दिले कि रविवारी सकाळी सहा वाजेपासुन विज खंडीत करण्याचे मोहिम सुरु केली आहे. मार्च महिन्यापर्यंत चे विज बिल भरण्यासाठी ग्राहकाला धारेवर धरत आहे. वीज कनेक्शन कापल्यानंतर ग्राहकाला फोन करून सांगतात की सोमवारी ऑफिसात येऊन बिल भरणा करा.
बाजार पेठ चालू होती त्यावेळेस महावितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी लाईनमन यांनी दुकानदारांना जाऊन सांगितले पाहिजे होते की, आज तुम्ही बिल भरा अन्यथा आम्ही आपले कनेक्शन आपल्या डोळ्यादेखत खंडीत करु तसे न करता. जनता कर्फ्यू लॉकडाउनच्या फायदा घेत महावितरण कंपनीने व्यापाऱ्याला वेठीत धरत आहे.
वीज कनेक्शन जोडण्यासाठी 230 रुपये ॲडिशनल चार्ज महावितरण कंपनीकडे भरणा करावा लागतो त्याशिवाय वीज पुरवठा चालू करत नाही . एका बाजूला कोरोनाचा वाढत प्रभावमुळे नागरीक आजारी पडत आहे. दुसऱ्या बाजूला तापमान वाढत आहे. त्यात नागरिकांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत जनतेने कोणाकडे दाद मागावी.
महावितरण कंपनीचे अधिकार्यांशी भ्रमणध्वनी केले ते म्हणाले की, आम्हाला वरून आदेश आहे. आपल्या शहरात किती कनेक्शन थकबाकी आहे ॽ आज किती कनेक्शन खंडित करणार आहोत ॽ असे विचारले असता सांगतो असे सांगून अधिकार्यांनी आपले तोंड बंद करून घेतले.