जुन महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार: तहसीलदार महेश पवार

Featured जळगाव
Share This:

जुन महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ मिळणार: तहसीलदार महेश पवार.

यावल ( सुरेश पाटील): राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजना अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल/केशरी शिधापत्रिका धारकांना जून2021 महिन्यात सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती यावल तहसीलदार महेश पवार यांनी दिली.
यावल तालुक्यातील(23575) एपीएल कार्डधारक शिधापत्रिका असून1,23975 योजनेतील लाभार्थ्यांच्या सदस्य संखेत या योजनेची प्रथम मागणी करणाऱ्यास देणे या तत्वावर सदर वितरण करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे योजनेचा लाभ प्रत्येक एपीएल केशरी शिधापत्रिका धारकाना(शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या) देण्यासाठी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
सर्व एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ याप्रमाणे दोन किलो अन्नधान्य माहे जून2021करीता सवलतीच्या दराने गहू 8रुपये प्रति किलो व तांदूळ12रुपये प्रति प्रतिकिलो वितरण करण्याची सूचना रेशन दुकानदारांना करण्यात आलेली आहे,तरी यावल तालुक्यातील सर्व एपीएल केसरी शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल तहसीलदार महेश पवार पुरवठा अधिकारी राजेश भंगाळे यांनी केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *