
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात : संजय राऊत
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात : संजय राऊत
मुंबई(तेज समाचार डेस्क): नेते पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकता, असे सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दलही शिवसेनेत प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दलही शिवसेनेत प्रवेशाबद्दल राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ‘पंकजा मुंडे यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच ऑफर देऊ शकता’ असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
खासदार संजय राऊत यांना पुण्यात पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ‘पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेनेच्या प्रवेशाच्या चर्चेबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहे. त्यांच्याशी चांगले संबंध आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर पक्षात घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील, असे राऊत म्हणाले .दरम्यान सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण काही लोकांना वाटत होतं की, हे सरकार 15 दिवसात कोसळेल. पणहे सरकार पूर्ण ताकदीने चाललेलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लढाई यशस्वीपणे सांभाळली आहे, असं ही राऊत म्हणाले.