निंभोरा पोलिसांनी ठेवली निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक

Featured जळगाव
Share This:

निंभोरा पोलिसांनी ठेवली निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक.

पावती पुस्तक निंबोल ग्रामपंचायतचे आणि पोलिसांकडून निंभोऱ्यात दंडात्मक कारवाई.

यावल (सुरेश पाटील):कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रस्त्यावर भटकंणाऱ्याकडून दंड वसुलीसाठी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलिसांनी निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 सामान्य पावती पुस्तक घेऊन स्वतः चिटणीसाचे स्वाक्षरीने निंभोरा परिसरातील नागरिकांवर काल दि.15 रोजी दंडात्मक कारवाई केल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून निंभोरा पोलिसांकडे निंबोल ग्रामपंचायतीचे पावती पुस्तक कोणत्या अधिकाराने, आणि कोणाच्या लेखी आदेशान्वये, आणि दंडात्मक वसुली निंभोरा गावात कोणत्या नियमाने करण्यात येत आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून निंभोरा पोलिसांनी ठेवली निंबोल ग्रामपंचायत चिटणीसच्या खांद्यावर बंदूक ठेवून परिसरातील नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केल्याने नागरिकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत रावेर तालुक्यातील निंबोल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एम.डी.पाटील यांच्याशी आज सकाळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता निंभोरा पोलिसांकडे निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 चे पावती पुस्तक दिले आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की निंबोल येथे मी चार पाच दिवसापूर्वी पदभार घेतला आहे तत्कालीन ग्रामसेवक यांनी पावती पुस्तक दिले असेल?त्याबाबत मला काहीच माहिती नाही असे सांगितले.


तसेच निंबोल ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक गणेश पाटील यांच्याशी आज सकाळी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की निंबोल ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 पावती पुस्तक हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निंभोरा पोलिसांना दिले असल्याचा त्यांनी दुजोरा दिला.रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी किंवा रावेर तहसीलदार यांनी लेखी आदेश दिले असल्यास त्याची छायांकित प्रत माहितीसाठी मला द्या असे सांगितले आदेश शोधावा लागेल असे उत्तर मिळाले.ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 7 चे पावती पुस्तक ग्रामपंचायत चिटणीस या नावाने पोलिसांना दंडात्मक कारवाई करताना पावती देता येते का?असा कायदेशीर प्रश्न उपस्थित केला जात आहे,आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तरी पोलीस अधीक्षक जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव,बिड़ीओ रावेर,डीवायएसपी फैजपूर, तहसीलदार रावेर,यांनी जनतेच्या माहितीसाठी जाहीर खुलासा करावा असे संपूर्ण यावल रावेर तालुक्यात आणले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,निंभोरा येथे गुरुवार दि. 15रोजी गावात एकाच ठिकाणी गर्दी करत भाजी पाला विक्रेते, भाजीपाल्याचे दुकाने लावल्यामुळे भाजी पाला घेणाऱ्यांची गर्दी झाली होती यावर निंभोरा पोलीस स्टेशन तर्फे कारवाई करण्यात आली.भाजीपाला विक्रेत्यांचे वजन माप काटे जमा करण्यात येऊन कारवाई करण्यात आली.भाजीपाला जिवनावश्यक वस्तू कायद्यात येत असला तरी कोरोना महामारी आपत्ती कायदयानुसार गर्दी,जमाव जमा केल्याबद्दल सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यातआले.
निंभोरा पोलिसांनी भाजीपाला विक्रेत्यावर निंभोरा बु.ग्रामपंचायत परिसरात कारवाई करण्यात आली परंतु त्यांना दंड पावती म्हणून रुपये 500 भरण्यात सांगितले भाजीपाला विक्रेते आपले वजन काटे घेण्यास गेले तेव्हा चक्क दंड पावती ही निंबोल ग्रामपंचायत नमुना7ची सामान्य पावती त्यांना देण्यात आली. कारवाई मात्र निंभोरा गावात असे निदर्शनात आले.
नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा दुकाने,फळांची दुकाने,डेअरी,मिठाई,खाद्य पदार्थ दुकाने,दररोज सकाळी 7 ते रात्री 8 च्या वेळेस सुरु ठेवता येतील, (आठवडे बाजार बंद राहतील) अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार व दुकानात काम करणारे कर्मचारी, ग्राहक यांनी कोविड नियमावलीचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती रु. 500दंड आकारणी करण्यात येईल तसेच कोविड नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना रु1000मात्र दंडाची आकारणी करण्यात येईल याबाबत पुन्हा नियमावलीचे भंग केल्याचे आढळून आल्यास असे दुकाने हे सिल करण्यात येतील व कोविड -19आपत्तीचे निराकारण होई पावेतो अशी दुकाने बंदच राहतील.असे आदेशांचे पालन करावे. असे शासकीय यंत्रणेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच निंभोरा पोलिसांनी दंडात्मक कारवाई करताना प्रत्यक्ष दंड वसूल करीत असताना त्याच्याच नावाने किंवा स्वाक्षरीने दंडाची पावती नागरिकांना द्यावी असे सुद्धा बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *