खिर्डी परिसरात अवैध देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांची कार्यवाही..!

Featured जळगाव
Share This:

खिर्डी परिसरात अवैध देशी विदेशी गावठी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांची कार्यवाही..!

यावल ( सुरेश पाटील): निंभोरा पोलिसांची आज दि.17 एप्रिल 2021रोजी सकाळी12 वाजेपासून ते 5 वाजे पावेतो खिर्डी, ऐनपूर व निंबोरा बुद्रुक या गावातील अवैध धंद्यांवर कारवाई केली असून ऐनपूर गावाचे हद्दीतील ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावरील चिंचफाट्याच्या पुढे संकेत धाब्याच्या आडोशाला मधुकर प्रभाकर ठाकूर वय 30 रा.खिर्डी बुद्रुक तालुका रावेर यांनी 6922 रुपये किमतीची देशी-विदेशी कंपनीच्या सिलबंद बाटल्यांची चोरटी विक्री विनापास परवाना करताना मिळून आल्याने तसेच खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ऐनपुर रस्त्यावरील ब्रम्हा ढाब्याच्या आडोशाला ब्रम्हानंद छगन जयस्वाल व 41रा.खिर्डी बुद्रुक तालुका रावेर यांनी 3330 रुपये किमतीची विदेशी दारूची विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आला आहे.तसेच खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ते ऐनपूर रस्त्यावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढे असणार्‍या भाऊ ढाब्याच्या आडोशाला चंद्रकांत जयराम कोळी वय 30 रा.जळगाव तालुका जळगाव हल्ली मुक्काम वाघाडी यांनीसुद्धा 2665 रुपये किमतीची विदेशी दारूची चोरटी विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आले आहे.असे एकूण 12 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 व कोरोना अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून भा.द.वि.कलम188,269 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच निंभोरा बुद्रुक गावातील भरत रमेश महाले वय 27 व निलेश संतोष कोळी वय 24 रा.निंभोरा बु.यांनी देखील त्यांच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू अनुक्रमे 15 लिटर सहाशे रुपये किमतीची व वीस लिटर आठशे रुपये किमतीची दारु कब्जात बाळगून चोरटी विक्री करत असताना मिळून आले आहे.

म्हणून त्यांचे विरोधात निंभोरा पोलीस स्टेशन येथे वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कार्यवाही ही माननीय सपोनि स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश वराडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्‍वर चौधरी,पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश सूर्यवंशी,पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक स्वप्नील पाटील व होमगार्ड योगेश फालक यांनी केलेली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *