निंभोरा बु.ग्रामपंचायत चे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

Featured जळगाव
Share This:

निंभोरा बु.ग्रामपंचायत चे स्वच्छतेकडे दुर्लक्ष..!

सरपंचाच्या वार्डातच घाणीचे साम्राज्य, दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची समस्या,नागरीकांचे आरोग्य धोक्यात….रहीवाशांचा उपोषणाचा ईशारा.

यावल ( सुरेश पाटील): रावेर तालुक्यातील निंभोरा बु.हे केळी व्यवसायातील नावाजलेले, मार्केट असलेले गावं,बँक,पोलिस स्टेशन,रेल्वे,बस,असे सर्व सुविधा युक्त गावं परंतू हे गावं काही समस्यांनी ग्रासलेले आहे ग्रामस्वच्छतेकड़े दुर्लक्षीत गांव आहे.
सविस्तर वृत्त असे की, निंभोरा बु.गावात सरपंचाच्या वार्ड क्र.१कोळीवाड्या मध्ये गावातील गटारीचे दुर्गंध युक्त सांडपाणी वाहून वाघोदा-खिर्डी मेनरोड वर कोळीवाडा परिसरात येत आहे.या मुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येऊन या भागात दुर्गंधी युक्त वास येत आहे याकडे निंभोरा बु.ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना तोंडी लेखी सुचना देऊन सुध्दा दुर्लक्ष करत असून याकडे कोणीही लक्ष देत नाही.
त्यांतच जग हे कोरोना महामारी संसर्ग संकटाच्या लाटेशी लढत असतांना घाणीच्या साम्राज्या विषयी निंभोरा बु. कोळीवाडा परिसरातील रहिवाशांना व नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.आरोग्याची समस्या उत्पन्न होऊन,या समस्ये विरोधात उभे राहून लढावं लागते की काय.? असा ही प्रश्न ही रहिवाशांमध्ये निर्माण झाला आहे.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी न खेळता साथीचे रोग प्रसारणाच्या आधी लवकरात लवकर साफ़-सफाई करण्याची मागणी” परिसरातील राहिवाशीयांकडून करण्यात आली आहे त्या संदर्भात संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी रोहिदास कोळी यांनी प्रतिक्रीया सोशल मिडिया वर व्हायरल पोस्ट करुन स्वच्छते विषयी समस्या मांडली आहे.
तसेच निंभोरा बु.कोळीवाडा परिसरातील नागरिकांनी लेखी तक्रार सुद्धा सरपंच,ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दि.19/4/ 2019 रोजी करून नागरिकांना भेडसावणाऱ्या दुर्गंधीयुक्त गटाराचे पाणी व घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आपण लवकरात-लवकर योग्य ती दखल न घेतल्यास वार्ड क्र.१ मधील रहिवाशी/नागरिकांनी आमरण उपोषण करण्याचं इशारा निंभोरा ग्रामपंचायतीला ग्रा.वि.अधिकारी/सरपंच यांना दिला,दिलेल्या निवेदनावर ललित जीवन सोनार, रोहिदास तायडे,अल्तमश खान,रोशन महाले,आनंद महाले,महेंद्र महाले, शुभम दोडके, पवन कोळी, वैभव कोळी,आकाश महाले,प्रशांत सपकाळे,सागर महाले,मोहन मोरे,सुभाष मोरे,मुकेश कोळी, कुणाल कोळी इत्यादी ग्रामस्थांनी आपली स्वाक्षरी केली आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *