नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट- नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Featured मुंबई
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क): केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नुकतेच स्वेच्छेने आपली जुनी गाडी स्क्रॅप करण्याचे धोरण केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलं. आता जुनी गाडी स्क्रॅप केल्यानंतर नव्या कारवर घसघशीत सूट मिळणार आहे.

वाहनांना स्वइच्छेने जो व्यक्ती स्क्रॅप करेल त्याला नवीन गाडी खरेदी करत असताना वाहन कंपन्या पाच टक्के अतिरिक्त सूट देतील. अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. पंधरा वर्षापुर्वीच्या जुन्या गाड्या हद्दपार करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल.

नवीन स्क्रॅप धोरणात चार घटक ठेवण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर आणि इतर शुल्क आकारण्यात येईल. तसेच, फिटनेस आणि पीयूसी प्रमाणपत्र घेणं बंधनकारक असेल. त्यासाठी देशात सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्र उभारण्याच्या दिशेने केंद्र सरकारचं काम सुरू असल्याचं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

सेल्फ ड्राईव्ह फिटनेस केंद्रामध्ये जर वाहन उत्तीर्ण नाही होऊ शकलं तर त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. वाहन क्षेत्रांमध्ये हे धोरण क्रांती घडवून आणेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *