
आज दुपारी यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम
आज दुपारी यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम
यावल ( सुरेश पाटील): आज दि.20 बुधवार रोजी दुपारी 3 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यावल तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन्मान सत्काराचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्रभैया पाटील, हाजी गफ्फार मालिक, माजी आमदार मनिषदादा जैन, खासदार सौ रोहिणीताई खडसे, यांच्यासह सौ कल्पनाताई पाटील, उमेश नेमाडे, सोपान पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील सर्व फ्रटल अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती
प्रा.मुकेष येवले(तालुकाअध्यक्ष),ॲड देवकांत पाटील(युवक अध्यक्ष), करीम मन्यार(यावल शहर अध्यक्ष),
अनवर खाटीक(फैजपूर शहर अध्यक्ष),हितेश गजरे(युवा शहर अध्यक्ष) यांनी केली आहे.