
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात
मुंबई (तेज समाचार डेस्क): अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बॅालिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांमधील काही कलाकारांची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. अशातच दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.
ऋषिकेश पवार हा सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याच्या आरोपावरुन त्याला काही दिवसांपासुन एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. मात्र अनेकवेळा नोटीस पाठवून देखील ऋषिकेश चौकशीसाठी गेला नव्हता. त्यामुळे एनसीबीचे पथक ऋषिकेशच्या चेंबूरच्या घरी गेले होते. मात्र ऋषिकेश घरी नसल्यामुळे एनसीबीने त्याला फरार म्हणुन घोषीत केलं होतं.
आज पोलिसांनी ऋषिकेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एनसीबीनं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला आहे. पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेतलं असुन, सुशांतचा ड्रग्जशी नेमका काय संबंध होता या माहितीसाठी एनसीबीकडुन ऋषिकेशची चौकशी केली जाणार आहे.