शिरपूर: मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन

Featured धुळे
Share This:

मंदीर उघडण्याच्या मागण्यासाठी शिरपूरात भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे आंदोलन

शिरपूर (मनोज भावसार): राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी शिरपूरात आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलनप्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिरपूर शहरातील यशवंत बालक मंदीर जवळील श्री. राम मंदिर येथे आज (दि.१३) रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा धुळे मा. जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, एन. डी. पाटील, संजय आसापूरे, महेंद्र पाटील, रोहित शेटे, अविनाश शिंपी, सुनिल चौधरी, रविंद्र भोई, रविंद्र सोनार, मुकेश पाटील, विक्की चौधरी, हिरालाल कोळी आदींसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. काही धार्मिक संघटनांच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, कोरोनामुळे सात महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु, केंद्र सरकारच्या निर्देशा नुसार राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये अटी व शर्तींच्या अधीन राहून सूट मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरे देखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी धार्मिक संघटना तसेच जनतेकडून केली जात आहे. एकीकडे राज्य सरकार दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देत आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास नकार देणे योग्य नाही. मंदिरे बंद असल्याने अनेक व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे ह.भ.प महंत सतीश भोंगे महाराज, महंत अशोकदास महाराज, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तालुकाध्यक्ष बापु पाटील, जगदिश पाटील, राजु मिस्तरी, नथ्था पाटील, हिरामण पाटील, सुरेश पाटील, भागवतचार्य गौभक्त प्रमोद भोंगे, अमिमन गुजर, रामदास चौधरी, भानुदास मोरे, गोंविद मोरे, अधिकार माळी, संतोष माळी, उमेश पाटील, शिवाजी पाटील, अरविंद्र बोरसे यांनी आंदोलनामागची भूमिका मांडताना केली. राज्य सरकारने मंदिरे उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *