आमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम

Featured जळगाव
Share This:

आमदार शिरीष चौधरींकडून यावल नगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी,राजकीय चर्चेला पूर्णविराम

 

यावल (सुरेश पाटील): येथील नगरपरिषदला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत1कोटी20लाख रुपयांचा निधी मंजुर केला असुन तसे पत्र नगरपरिषदला प्राप्त झाले आहे. दरम्यान मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी4कोटी92लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि यावल नगरपालिकेला आमदार चौधरी यांनी निधी का दिला नाही?यावल नगरपालिकेत काँग्रेसचे अधिकृत एकूण7सदस्य असताना निधी का मिळाला नाही?याबाबत राजकारणात चर्चा सुरू झाली होती,परंतु आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे राजकीय दृष्ट्या आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत लक्षवेधी शहर असल्याने शहरातील देखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोनातुन आमदार चौधरी यांनी वैशिष्टपुर्ण कामांसाठी1कोटी20लाखांचा निधी मंजुर केला.दि.3मे2021रोजी तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगरपरिषदेला पाठविले आहे. लवकरच शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरूवात होइल.या निधीमुळे यावल नगरपरिषदच्या विकास कामांना गती व दिशा मिळेल,यावल नगरपालिकेला निधी प्राप्त झाल्याने राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला.
अखेर या निधीचा लाभ पावसाळ्यापुर्वी होणाऱ्या विकास कामावर व्हावा अशी अपेक्षा सुद्धा यावलकराकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *