युवारंग फाऊंडेशनतर्फे शहीद दिन साजरा

Featured जळगाव
Share This:

युवारंग फाऊंडेशनतर्फे शहीद दिन साजरा

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): येथील युवारंग फाउंडेशनतर्फे २३ मार्च शहीद दिनानिमित्त प्रतिमा पुजना करुन शहीदांना अभिवादन करण्यात आले.  आज युवारंग फाउंडेशनच्या कार्यालयात शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर फक्त प्रतिम पूजनाचाच कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी युवारंग फाऊंडेशनचे अनिल राजपूत, शुभम पाटील, भावेश मंडलिक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. फाऊंडेशनचे जितेंद्र लुळे, सचिव राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार, सदस्य ऋषिकेश मंडलिक उपस्थित होते. जितेंद्र लुळे यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या कार्याची माहिती दिली. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. भगतसिंग यांच्यावरील एक कविता सादर करण्यात आली. यातिन्ही क्रांतिकारकांचे स्मरण नियमित सर्वांना व्हावे यासाठी युवारंग फाउंडेशन नेहमी प्रयत्नशील राहील, असे पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *