मराठा समाज हा सर्व समाज व सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आहे

Featured जळगाव
Share This:

मराठा समाज हा सर्व समाज व सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आहे.

मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे; राम पवार

यावल (सुरेश पाटील): मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे असे मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राम पवार यांनी मराठा सेवा संघ वर्धापन दिनी यावल येथे बाजार समिती च्या सभागृहात अध्यक्ष स्थानी बोलताना सांगितले यावेळी व्यासपीठावर यावलचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती मध्ये यावल नगरपालिकेचे माजी उपानगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले सर,संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष विजय पाटील(किंनगाव)मराठा सेवा संघाचे तालुका अध्यस अजय पाटील सर. नुतन मराठा महाविद्यालय जळगाव
येथिल प्रा. डॉ.हेमंत येवले सर,महावितरणचे उपकार्यकरी अभियंता दिलीप मराठे यावल पंचायत समितीचे बी.डी.ओ डॉ.निलेश पाटील,दहिगाव माजी सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देविदास धागो पाटील,मराठा सेवा संघाचे सचिव संतोष पाटील उपस्थीत होते. तसेच राम पवार यांनी पुढे बोलतांना सागितले कि,नोकरीच्या मागे न लागता मराठा समाजातिल तरुणाना व्यवसायत चागली प्रगती करता येवू शकते यावेळी दीपक गोकुळ पाटील याने यावल किसान प्रोड्युसर लिमिटेड कंपनी स्थापनेत पुढाकार घेऊन तरुणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना उपन्न वाढीसाठी एक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राम पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील,वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन संघटन शक्ती काळाची गरज आहे.मराठा तरुणांना उद्योग क्षेत्रात इतर काही अडचण असल्यास विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आस्वासन दिले.
उपकार्यकारी दिलीप मराठे यांनी वर्धापन दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त करत समाजाला एकत्र येणे हि काळाची गरज आहे.मराठा समाज सांतता प्रिय व सर्वाना एकत्र घेवून चालणारा समाज आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष अजय पाटील सर यांनी तर एन.पी.चव्हाण सर यांनी उपस्थितांचे आभार मानले, यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील मराठा सेवा संघ तालुका सचिव संतोष पाटील,पत्रकार सुनिल गावडे,बाजार समितीचे कर्मचारी किशोर सोनवणे,शेतकी संघाचे संजय भोईटे,यशवंत (बापू)जासूद
गुलाब पाटील,भागवत पाटील,निलेश पाटील,भूषण पाटील,राज्य कर्मचारी ,केंद्र कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते,कोरोनाचे महामारीचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला होता.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *