मालेगाव: पोलिस उपनिरीक्षक शेख यांनी गोळी झाडून केली आत्महत्या

Featured नाशिक
Share This:

मालेगाव (तेज समाचार डेस्क) : मालेगाव येथील पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रीडर पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी स्वतः च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून आत्महत्या केली.

दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास सदर घटना घडली आहे. येथील पोलिस नियंत्रण कक्ष परीसरात शेख यांनी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नसून ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *