
दिसू लागले ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचे परिणाम
यावल (सुरेश पाटील). संपूर्ण देशात कोरोना या निर्जीव विषाणूचा प्रकोप वाढत असताना 23 मार्च 2020 रोजी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर यावल शहरात नगरपालिका कर्मचारी टिम, ग्रामीण रुग्णालय टीम, यांच्यासह नगरसेवक लोकप्रतिनिधींनी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सामाजिक दायित्व म्हणून कर्तव्य समजून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वोतोपरि प्रयत्न केले, यात आज यावल शहरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे मनोगत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि यावल नगरपरिषद संचलित सानेगुरुजी विद्यालयाचे शालेय शिक्षण समिती सभापती अतुल पाटील यांनी व्यक्त केले.
संपूर्ण यावल तालुक्यात दीड हजारावर नागरिकांना कोरोनाची लागण झाली,परंतु यावल शहरात यावल नगरपालिका कर्मचारी टीमने, ग्रामीण रुग्णालयाच्या टीमने तसेच लोकप्रतिनिधींनी माझे कुटुंब माझी जबाबदारी लक्षात घेऊन वेळोवेळी सर्वतोपरी प्रयत्न केल्याने आज यावल शहरात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे यात यावल शहराची 40हजार लोकसंख्या लक्षात घेता फक्त 172 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असे मनोगत व्यक्त करीत त्यांनी यावल शहरातील पत्रकारांच्या कार्याचा गौरव करून पत्रकारांना सन्मानित केले ह्यानंतर सानेगुरुजी विद्यालयातील मुला-मुलींना माक्स चे महत्व पटवून तसेच कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून माक्स मोफत वितरण करण्यात आले कार्यक्रमात सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पाटील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेगडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ताडेकर यांनी केले