यावल तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र एजंट यांच्या साठी शासनाने लसीकरण शिबीर आयोजित करण्याची महेश वाणी यांची मागणी

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र एजंट यांच्या साठी शासनाने लसीकरण शिबीर आयोजित करण्याची महेश वाणी यांची मागणी

यावल (सुरेश पाटील) :दिवसेंदिवस कोरोनाने वाढणारी रुग्ण संख्या त्यात आपल्या जिवाची पर्वा न करता बातमी साठी धडपडणारे.पत्रकार प्रतिनिधी व तसेच उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्याही ऋतूत व या अशा लाँकडाऊन मधे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिवाची पर्वा न करता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वेळेवर वृत्तपत्र पोहोचवणाऱ्या वृत्तपत्रे एजंट बांधव यांच्यासाठी शासनाने यावल येथे तालुका स्तरावर तालुक्यातील पत्रकार व वृत्तपत्र एजंट यांना शिबिराचे आयोजन करून लस देण्यात यावी या साठी प्रशासनाने याची दखल घ्यावी.तरी संबंधित पत्रकार संघटनानी व वृत्तपत्र संघटनांनी प्रशासनास शिबीर घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी यावल वृत्तपत्र मुख्य विक्रेते महेश वाणी यांनी केली आहे.एका वृत्तपत्र एजंटने सकारात्मक दृष्टीने वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांचे आणि पत्रकारांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले त्याबद्दल त्यांचे प्रसिद्धी माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *